|Thursday, December 5, 2019
You are here: Home » भविष्य » दैवी शक्ती साक्षात्कार व अनुभूती म्हणजे खेळ नव्हे

दैवी शक्ती साक्षात्कार व अनुभूती म्हणजे खेळ नव्हे 

बुध. दि. 3 ते 9 एप्रिल 2019

अमुक एका घरी गणपती आला, महालक्ष्मी अवतरली, साईबाबा आले, ईश्वराचे दर्शन झाले, अमुक माता अथवा तमूक परमपूज्य आईचा दृष्टांत झाले, त्यामुळे त्यांचे भले झाले, घोडागाडी आली, लॉटरी लागली, लग्न झाले, परीक्षेत वरचा नंबर आला, गुप्तधन सापडले, कोर्टमॅटर यशस्वी झाले, मुले मार्गाला लागली, 21 लोकांना हा मेसेज पाठवा, अमुक दिवसात काहीतरी चांगली बातमी समजेल. हा संदेश डिलीट केलात तर भयानक अपघात, दुर्घटना होतील. होत्याचे नव्हते होईल. कल्पनाही करू शकणार नाही असे काहीतरी वाईट घडेल, असे संदेश गेल्या तीन चार वर्षापासून मोबाईलच्या वॉटसऍपवर फिरत आहेत, हे सारे मानसिक विकृतीचे काल्पनिक खेळ आहेत. तुम्ही पूजा करा, अथवा न करा संदेश पाठवा अथवा न पाठवा, देवाला काय फरक पडणार आहे? तो तुमचे वाईट कशाला करील? देव इतका स्वस्त नाही. देव म्हणजे दिव्य शक्ती. ती कुणाचे वाईट कशाला करील? अंतरात्मा व परमात्मा यातील फरक कळत नाही, देव म्हणजे काय याचे ज्ञान नाही, असे लोक केवळ करमणूक करण्यासाठी असे संदेश पाठवत असतात. 50-60 वर्षापूर्वी  अमूक इतकी पत्रे घाला. तितकी पत्रे घाला. पत्रे न पाठवल्यास काहीतरी अनिष्ट होईल. अशी भीती तेव्हाही घातली जात असे. त्याचे हे हल्लीचे सुधारीत स्वरुप आहे. कुणाला त्याचा काय फायदा अथवा नुकसान झाले हे समजले नाही, पण पोस्ट व टेलिफोन खाते व मोबाईल कंपन्यांचे उखळ मात्र पांढरे झाले. ‘सुपरस्टीशन इरॅडिकेशन ऍक्ट’ कायद्याखाली असे संदेश पाठविणे हा गुन्हा असून त्याला कठोर शिक्षा आहे हे या लोकांना बहुधा माहीत नसावे. अशा बातम्या अथवा संदेश आले तर फक्त त्याकडे करमणूक म्हणून पहावे व ते डिलीट करून टाकावे अशा संदेशाना फारशी किंमत देऊ नये, उलटपक्षी जर कुणी तक्रार केली, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. काहीजण आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे साक्षात्कार झाल्याचे सांगत असतात, अमुक इतके अनुभव आले असा डांगोरा पिटत असतात पण त्यांची वागणूक पहाता दैवी शक्तीचा लवलेशही दिसत नाही. मुळातच ज्यांच्याकडे खरोखर दैवी शक्ती आहे, तो अथवा ती अशी नाटके करणारच नाही. अथवा त्याचे प्रदर्शनही करणार नाही. अंधारात बॅटरीचा झोत पडल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो, त्याच न्यायाने पाहू गेल्यास दैवी शक्ती असल्याचे जे सांगतात, ते जेथे जातील तेथे इतरांचे चांगले व्हायला हवे. मुले परीक्षेत उत्तीर्ण व्हायला हवीत, बेकारांना नोकऱया मिळायला हव्यात, कितीही अडचणी अथवा दोष असले तरी लग्ने पटापट व्हायला हवीत. गरिबाघरी लक्ष्मीची कृपा व्हायला हवी, काही बाधा असतील तर नष्ट व्हायला हव्यात, असे झालेले कुठेही दिसत नाही. एखादी व्यक्ती खरोखरच साक्षात्कारी अथवा दैवी शक्ती असलेली असेल तर ते त्याच्या चेहऱयावरून पटकन समजते. त्याचे प्रदर्शन करावे लागत नाही. आपल्याकडे दैवी शक्ती आहे असे कुणाला सांगावे लागत नाही. आकाशात चंद्र, सूर्य आहेत हे सांगावे लागत नाही. त्यांचा प्रकाशच त्यांचे अस्तित्व दाखवून देतो. त्यामुळे दैवी शक्तीच्या नावाने कुणी नाटके करू नये. त्याचा पुढे त्रास होऊ शकतो. दैवीशक्ती असल्याचे जे कुणी सांगतात ते स्वत:च्या मनावर रागावर ताबा का ठेवू शकत नाहीत, त्यांची परिस्थिती का सुधारत नाही? याचाही विचार होणे आवश्यक आहे.

मेष

‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ ही उक्ती तुमच्या बाबतीत  या सप्ताहात खरी ठरेल. अकल्पित भाग्योदय होईल. शत्रू आपणहून थंड पडतील. महत्त्वाच्या अडचणीच्यावेळी शासकीय अधिकारी सहाय्य करतील. योग्य व तार्कीक विचारसरणीमुळे तुमचे मुद्दे खोडणे काहीजणांना कठीण जाईल. पण शेजारी नातलग व भावंडे यांच्याशी पटणार नाही. एखाद्या भावंडाची जबाबदारी सांभाळावी लागेल.

वृषभ

गुरु अनुकूल आहे. कुणाचाही विरोध सहज मोडून काढाल. काही जुनाट आजारांवर कायमस्वरुपी मार्ग निघेल. प्रेमप्रकरणापासून दूर राहिल्यास चांगले, अन्यथा नको ते आरोप येऊ शकतील. बाधिक दोष, विषारी कीटक, सर्पदंश यापासून धोका, वडिलोपार्जित संपत्ती असेल तर त्यात घोटाळे निर्माण होतील. एखाद्याला सल्ला द्यायला जाऊन संकटात पडाल. पोलीस केसेसपासून जपा.


मिथुन

गुरुची शुभ दृष्टी दशमावर आहे. नोकरी व्यवसायात उर्जितावस्था येऊ लागेल. हाती  घेतलेल्या सर्व कामात चांगले यश मिळवाल, पण मित्रंमडळींच्या सल्ल्यांपासून दूर रहावे. अन्यथा गोत्यात याल. शिक्षणात अडथळे येतील. संततीपासून त्रास होऊ शकेल. कलाकौशल्याच्या कामात उत्तम योग. पोटात व कंबरेत काही तरी होत आहे, असे सतत  वाटत राहील. प्रवास घडतील.


कर्क

गुरु पाचवा आहे. अत्यंत शुभ योग. मोठमोठे उद्योग धंदे, नोकरी यात मनासारखे यश मिळवाल. पुढे घडणाऱया काही घटनांची पूर्वसूचना मिळेल. सर्व बाबतीत यश देणारा आहे. नोकरी व्यवसायात जर काही समस्या असतील तर त्या सुटतील. देण्याघेण्याच्या व्यवहारातून संघर्ष होण्याचे योग दिसतात. लांबचे प्रवास, सहली टाळण्याचा प्रयत्न करा.


सिंह

वैवाहिक जोडीदाराच्या नातेवाईकांकडून काही अडचणी उद्भवतील. सहज केलेली चेष्टा, थट्टामस्करी, अंगलट येईल, काळजी घ्यावी. प्रवासात त्रास, कागदोपत्री व्यवहार मात्र यश देणारे ठरतील. मुलाबाळांच्या भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. जे काम हाती घ्याल त्यात दैवी साहाय्याचा भाग राहील. काहीजणांना अनपेक्षित बदलीला सामोरे जावे लागेल. कुणालाही शब्द देताना त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्या.


कन्या

पराक्रमातील  गुरुमुळे दैवी कार्यासाठी प्रवास घडतील. देवधर्माच्या कृत्यात चांगले यश मिळेल. देवघर ईशान्येला असेल तर निश्चित या आठवडय़ात शुभ व लाभदायक घटना घडतील. सरकारी कामात मोठे यश देणारा सप्ताह. आतापर्यंत खोळंबलेली अनेक कामे गतिमान होतील. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगले योग. घरगुती समस्या कमी हातील. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.


तुळ

धनस्थानातील गुरुमुळे आर्थिक स्थिती सुधारू लागेल. अनेक किचकट प्रश्न या आठवडय़ात सुटतील. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल योग. संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. भाग्योदयास सुरुवात होईल. पण एखाद्याचे भले करण्यास जावे तर त्यानेच आपल्यावर नको ते आरोप घालावेत, असे प्रकारही घडण्याची दाट शक्मयता. स्वत:चा  बचाव करून इतरांना सहाय्य करा.


वृश्चिक

गुरु, चंद्र गजकेसरी राजयोग झालेला आहे. आगामी दोन वर्षापर्यंत त्याची चांगली फळे मिळतील. अचानक धनलाभ, विवाह, संतती प्राप्ती अथवा संततीचा उत्कर्ष, प्रवासात लाभ, नवनव्या कार्यक्षेत्रात प्रवेशाच्या दृष्टीने वर्षभर चांगले योग पण वाहन जपून चालवा. दुर्घटना घडण्याची शक्मयता राहील. आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने अनुकूलता लाभेल.


धनु

राशीस्वामी गुरु बदलामुळे अध्यात्मिक शक्तीचा प्रभाव वाढेल. वर्षभर सतत काही ना काही दैवी अनुभव येत राहतील. काही जणांच्या आगमनामुळे घरात सतत अस्वस्थ वाटत राहील. मुलाबाळांच्या दृष्टीने जरा त्रासदायक, पण धनलाभ व इतर बाबतीत मोठे यश, अनेक महत्त्वाचे जटिल प्रश्न सोडविण्यास अनेकजण पुढे येतील. धनलाभाच्या नवनव्या संधी येतील.


मकर

गुरु लाभस्थानी म्हणजे एक प्रकारचा गडगंज श्रीमंती योग. आतापर्यंत खोळंबलेले आर्थिक व्यवहार मार्गस्थ होतील. सर्व गैरसमज दूर होतील. अवघड कामाची सुरुवात करू शकाल. सांसारिक सौख्यात वाढ होईल न जुळणारे लग्न ठरेल. काही नव्या समस्या निर्माण होतील. त्यासाठी विचारपूर्वक वागावे. एखादा गंभीर रुग्णाला मदत करण्याची वेळ येईल.


कुंभ

दहावा गुरु प्रभावी आहे. नोकरी व्यवसायात चांगले बदल घडवील. माता-पित्यांच्या बाबतीत सौख्यदायक वातावरण. एखाद्या अति महत्त्वाच्या व कठीण कामात यश. पण किरकोळ कारणासाठी मोठे खर्च करावे लागतील. दिवाळीपर्यंतच्या पंधरवडय़ात महत्त्वाच्या घटना घडवील. अपेक्षा नसताना एखादी महत्त्वाची शुभ वार्ता ऐकू येईल.


मीन

गुरु भाग्यात हा अत्यंत शुभयोग आहे. मंगलकार्य, दैवीकार्य, धनलाभाच्या बाबतीत अनुकूलता लाभेल व मुलाबाळांचा भाग्योदय होईल. वैवाहिक जीवनाला शुभ कलाटणी. अनेक महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. भावंडांत वितंडवाद असतील तर ते कमी होतील. मालमत्तेच्या वाटण्यासंदर्भात वादावादी. नोकरवर्गात काही तरी गोंधळ उडण्याची शक्मयता. मन शांत ठेवून वागणे आवश्यक.

Related posts: