|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » ‘कॅश फॉर वोट’ हे काम काँगेसचे : पेमा खांडू

‘कॅश फॉर वोट’ हे काम काँगेसचे : पेमा खांडू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे. ‘कॅश फॉर व्होट’ हे काम काँग्रेसचे आहे, असा पलटवार त्यांनी यावेळी केला.

प्रेमा खांडू यांच्या ताफ्यातील एका कारमधून 1.80 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला होता. पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओ सुद्धा प्रसिद्ध केला होता. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगाच्या चौकशीत सर्व काही समोर येईल.