|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » राहुल गांधींना ‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमा आवडेल

राहुल गांधींना ‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमा आवडेल 

 

 

 

ऑनलाईन टीम / मुंबई  :  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देशभक्त आहेत. त्यामुळे त्यांनी ‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमा पाहिला तर त्यांना हा सिनेमा जरूर आवडेल, असं मत अभिनेता विवेक ओबेरॉय याने व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीमुळे ’पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक पक्षांनी हा सिनेमा निवडणुकीनंतर प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना विवेक ओबेरॉय बोलत होता. ’पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमापूर्वी प्रदर्शित झालेल्या इतर राजकीय सिनेमांना अनेकांनी पाठिंबा दिला. परंतु, आता माझ्या या चित्रपटाला विरोध केला जात आहे, असं सांगतानाच मी हा सिनेमा कधी प्रदर्शित करू शकेल? हे कोणी सांगू शकतं का? ही तर हुकूमशाही आहे. आपण लोकशाहीत राहतो. इथे तुमच्या बापाचं नाव चालत नाही, तर तुमचं काम चालतं, असंही त्याने सांगितलं.