|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » उद्योग » भारतीय युवकांची नोकरीसाठी सर्वाधिक पसंती ‘फ्लिपकार्ट’ला

भारतीय युवकांची नोकरीसाठी सर्वाधिक पसंती ‘फ्लिपकार्ट’ला 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

सध्या भारतात वाढत्या लोकसंख्येसोबत रोजगाराचाही प्रश्न एका बाजूला आहे तर दुसऱया बाजूला युवकांच्या बदलत्या शैलीप्रमाणे रोजगाराचे मार्गही बदलताना दिसताहेत. एका अहवालानुसार भारतीय युवक ऑनलाईन क्षेत्रात कार्यरत असणाऱया पंपन्याची निवड करत असल्याचे दिसताहेत.

यामध्ये फ्लिपकार्ट या कंपनीला सर्वाधिक पसंती दिलेली आहे. त्यापाठोपाठ ऍमेझॉनची निवड करण्यात आलेली आहे. आणि तिसऱया स्थानी ओयोचा नंबर लागतो ही माहिती व्यावसायिक सोशल मीडिया नेटवर्क लिंक्ड-इन यांच्याकडून टॉपच्या 10 कंपन्याची यादीत ही माहिती सादर करण्यात आली आहे. प्रथम कंपनी विषयी किती आवड आहे, रेजगारा विषयीची अपेक्षा अशा प्रकारच्या नियमावलीचे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. 

टीसीएच प्रथमच समावेश

लिंक्ड-इनकडून सादर केलेल्या यादीत प्रथमच टाटा कन्सलटेन्सी सर्व्हिस (टीसीएस) समावेश करण्यात आलेला आहे. यात सातव्या स्थानी जागा मिळाली आहे. उबेरचा पाचवा क्रमाक आहे. आणि अन्न वितरण क्षेत्रात कार्यरत असणाऱया नवीन कंपन्या स्विगी आणि झोमॅटो यांचाही या यादीत समावेश आहे. अन्य कंपन्यामध्ये वन97 कम्युनिकेशन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा यात समावेश केल्याची नेंद करण्यात आली आहे.

इंजीनिअरींग विभागाला अधिक संधी

जादातर कंपन्यांनी रोजगाराच्या अधिकच्या संधी या इंजीनिअरींग क्षेत्रातील युवांसाठी उपलब्ध करुन दिली आहे त्यानंतर अन्य क्षेत्रांतील युवकांना संधी निर्माण करुन दिल्याची माहिती सदरच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आली आहे.

Related posts: