|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » राजू शेट्टींनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

राजू शेट्टींनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागितली आहे. देशपांडे, कुलकर्णींची मुले देशासाठी शहीद होत नाहीत, शेतकऱयांची मुलं शहीद होतात, असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी हेरले येथील प्रचारसभेत केले होते.

त्यांच्या या वक्तव्यानंतर ब्राह्मण समाजातून संताप व्यक्त करण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हातकणंगले येथे महाआघाडीचे उमेदवार आहेत.

राजू शेट्टींविरोधत कोल्हापुरमध्ये पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती. पण अखेर राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. शहिदांना न्याय देण्याच्या हेतूने आपण हे वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.