|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ‘मिशन शक्ती’चा कचरा 45 दिवसात होईल नष्ट

‘मिशन शक्ती’चा कचरा 45 दिवसात होईल नष्ट 

अमेरिकेकडून भारताला दिलासा

वॉशिंग्टन:

भारताच्या एँटी उपग्रह क्षेपणास्त्र परिक्षणामुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा वातावरणात आपोआप जळून नष्ट होईल, असे अमेरिका रक्षा मंत्रालयाच्या पेंटागॉन मुख्यालयाने म्हटले आहे. मुख्यालयाच्या स्पष्टीकरणामुळे भारताला दिलासा मिळाला आहे. अमेरिकी अंतरिक्ष एजन्सी (नासा) ने भारताच्या मिशन शक्तीवर चिंता व्यक्त केली होती. तसेच त्यातून तयार झालेल्या कचऱयामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनला धोका असून भारताने महाभयंकर कृत्य केल्याचे म्हटले होते.

भारताने 27 मार्चला जमिनीपासून सुमारे 300 किलोमीटर उंचीवर आपल्या उपग्रहाला विरोधी उपग्रहाच्या क्षेपणास्त्राने पाडण्याची चाचणी घेतली होती. त्यानंतर अंतराळात उपग्रह पाडण्याची क्षमता असणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश बनला. भारताने या चाचणीला मिशन शक्तीने संबोधले आहे. भारताने अंतराळात उपग्रह पाडल्यानंतर 400 तुकडय़ांचा कचरा तयार झाला आहे. आत्तापर्यंत सुमारे 60 तुकडय़ांची माहिती मिळाली असून ज्यामुळे 24 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनला धोका निर्माण होणार आहे, असे नासाचे प्रशासक जिम ब्राइडेंस्टाइन यांनी म्हटले होते.

ब्राइडेंस्टाइनचे वक्तव्य हे अमेरिकेच्या कार्यवाहक सुरक्षामंत्री पैट्रिक शानाहानच्या  विरुद्ध होते. भारताच्या ए-सॅट चाचणीमुळे तयार झालेला कचरा अंतराळात नष्ट होईल, असा अंदाज शानहान यांनी 28 मार्चला व्यक्त केला होता. त्यानंतर पेंटागनचे प्रवक्ता चार्ली समर्स यांनी शानहान यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याचे म्हटले आहे.

चीनने 2007 मध्ये ध्रुव कक्षात एक उपग्रह नष्ट केल्यामुळे अंतराळात सर्वात जास्त कचरा तयार झाला होता. यात 3000 पेक्षाही जास्त तुकडे विखुरले गेले होते. तर चीनने 800 किलोमीटरच्या उंचीवर हा उपग्रह पाडला होता त्यामुळे तयार झालेले तुकडे आजही अंतराळात आहेत. 2007 मधील चीनने केलेली चाचणी टाळत भारताने निम्न कक्षेत चाचणी घेतली. भारताच्या चाचणीमुळे अंतराळात तयार झालेला कचरा 45 दिवसात नष्ट होईल, असे भारताच्या वरिष्ट सुरक्षा शास्त्रज्ञांनी नासाने व्यक्त केलेल्या चिंतेवर म्हटले आहे.

Related posts: