|Sunday, August 18, 2019
You are here: Home » क्रिडा » हॉलंडच्या बर्टन्सला पराभवाचा धक्का

हॉलंडच्या बर्टन्सला पराभवाचा धक्का 

वृत्तसंस्था/ साउथ कॅरोलिना

डब्ऱयुटीए टुरवरील येथे सुरू असलेल्या चार्लस्टन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत हॉलंडच्या माजी विजेत्या किकी बर्टन्सला तिसऱया फेरीत पराभवाला सामोने जावे लागले. मारिया सॅकेरेन बर्टन्सला पराभूत करत चौथी फेरी गाठली. अमेरिकेच्या स्टिफेन्सने एकेरीची चौथी फेरी गाठली.

गुरूवारी झालेल्या महिला एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात मारिया सॅकेरीने बर्टन्सचा 7-6 (8-6), 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. सॅकेरीचा चौथ्या फेरीतील सामना डेन्मार्कच्या कॅरोलिना वोझ्नियाकीशी होणार आहे.  दुसऱया एका सामन्यात अमेंरिकेच्या स्लोनी स्टिफेन्सने टॉमलेजोनोव्हिकचा 4-6, 6-4 6-4  असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. डेन्मार्कच्या वोझ्नियाकीने रूमानियाच्या बुझारेनमेस्कुवर 6-4, 3-6. 6-3 अशी मात केली. नवव्या मानांकित बेनसिकने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना टाउनसेंडचा 6-2, 7-5, पेत्रा मार्टिकने पेगुलाचा 2-6, 6-3 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.