|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रामेश्वर यात्रेनिमित्त पंत बाळेकुंद्रीत आज रथोत्सव

रामेश्वर यात्रेनिमित्त पंत बाळेकुंद्रीत आज रथोत्सव 

सांबरा / वार्ताहर

पंत बाळेकुंद्री येथे शनिवार दि. 6 रोजी रामेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त रथोत्सव होणार आहे. पूज्य श्री परवय्या हिरेमठ स्वामीजी (बेळवी, ता. हुक्केरी) व पूज्य श्री चिन्मय शिवम स्वामीजी (पंतबाळेकुंद्री) यांच्या सान्निध्यात दुपारी दोन वाजता रथोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्त संस्थानचे अध्यक्ष प्रदीप पंतबाळेकुंद्री, सीपीआय विजयकुमार सिन्नूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाविकांनी रथोत्सवात भाग घ्यावा, असे रामेश्वर देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांनी कळविले आहे.