|Monday, February 17, 2020
You are here: Home » मनोरंजन » प्रभास घेतोय हॉलीवुडमधील लोकांकडून ऍक्शनचे धडे

प्रभास घेतोय हॉलीवुडमधील लोकांकडून ऍक्शनचे धडे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बाहुबली सुपरस्टार प्रभास, आगामी साहो चित्रपटासाठी अथक तयारी करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत देखील प्रत्येक ऍक्शन सीन बारीक लक्ष्य देऊन काम करत असून प्रत्येक सीन मध्ये प्रभासला प्रभावीपणे पडद्यवार दाखवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सुजीत यांनी सांगितले आहे.

साहोच्या एक्शनसाठी, हॉलीवूडमधील 50 लोकांची एक टीम भारतात आली आहे. प्रभासला वेगळय़ा ऍक्शन सीनसाठी प्रशिक्षित करेल. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या 50 लोकांनी अनेक हॉलीवूड चित्रपटांसाठी काम केले आहे. या 50 लोकांची टीम प्रत्येक लहान हालचाली पासून ते प्रत्येक प्रेम बद्दल प्रभास ला प्रशिक्षण देत आहेत. ज्यामुळे ऍक्शन सीन अधिक प्रभावी होईल.

ट्रान्सफॉर्मर्स फेम, हॉलीवूड चे प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर केनी बेट्स, ह्याने चित्रपटातील ऍक्शन सीन दिग्दर्शित केले असून तो प्रभासच्या अचाट इच्छाशक्ति आणि समर्पण पाहून खूपच प्रभावित आहे. साहो मध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या सह नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मनोरंजनचा तडका लगावतना दिसतील. हा चित्रपट भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये शूट केला गेला आहे.

या चित्रपटात फोटोग्राफी दिग्दर्शक, अनुभवी एडिटर श्रीकर प्रसाद आणि लोकप्रिय प्रोडक्शन डिझायनर सब्बू सिरिल यांच्या उपस्थितीसह करण्यात आले आहे.

Related posts: