|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » काँग्रेस, बिजदकडून गरीबांचा वापर राजकारणासाठी

काँग्रेस, बिजदकडून गरीबांचा वापर राजकारणासाठी 

ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :

काँग्रेस आणि बिजू जनता दलाने आजपर्यंत गरीब जनतेचा केवळ राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

सोनेपूर येथील एका प्रचार सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, गरीबांचा केवळ मतांसाठी वापर करणाऱया पक्षांपैकी काँग्रेस आणि बिजू जनता दल आहे. त्यांच्या धोरणांमुळे अनेक दशकांपासून ओडिशासह देशभरातील मोठा भाग हा दारिद्य रेषेखाली राहिला आणि त्यामुळेच याचा गैरवापर नक्षलवाद्यांनी केला.

Related posts: