|Monday, August 26, 2019
You are here: Home » विविधा » माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतून साकारले गणरायाचे रुप

माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतून साकारले गणरायाचे रुप 

 प्रतिनिधी / पिंपरी :  अभिजित धोंडफळे, मोरेश्वर जोशी, डॉ.केदार संत,उमा धोंडफळे व दिप्ती धोंडफळे यांनी 25/30 किलो गोपीचंदनाचा वापर करून माऊलींच्या संजीवन समाधीवर श्रीगणरायाचे अतिशय विलोभनीय व देखणे रूप साकारले. आजची ही पहिलीच चंदन उटी पुर्ण करण्यासाठी त्यांना तब्बल तीन तासांचा अवधी लागला.

स्वकाम सेवा मंडळ व ज्ञानेश्वर महाराज देवस्थान यांच्या वतीने आजची ही पहिलीच उटी साकारण्यात आली.यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड.विकास ढगे पाटील, डॉ.अभय टिळक, प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, स्वकामचे अध्यक्ष सुनिल तापकीर, स्वामी गावडे, सुभाष व बोराटे,मनसुख लोढा, बाबुराव मोरे,मालक बाळासाहेब आरफळकर (पवार) आदींसह भाविक-भक्त व मानकरी तसेच आळंदीकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

चंदन उटी साकारताना काही काळ माऊलींचे मुख दर्शन ठेवण्यात आले होते,तर सायंकाळी सहा नंतर चंदन उटीतुन साकारलेले गणरायाचे विलोभनीय रुप नेत्रात साठवून ठेवण्यासाठी माऊली भक्तांनी रात्री उशिरापर्यंत दर्शनार्थ मंदीरांमध्ये एकच गर्दी केली होती.