|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » एफ-16 वरून इम्रान खान यांचा मोदींवर हल्लाबोल

एफ-16 वरून इम्रान खान यांचा मोदींवर हल्लाबोल 

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

एफ-16 विमानांवरुन पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवरुन नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पाकच्या ताफ्यातील सर्व अमेरिकन एफ-16 विमाने सुरुक्षित असून, भारतीय हवाई दलाचा दावा चुकीचा असू शकतो, असे वृत्त अमेरिकन मासिकाने प्रसिद्ध केले होते. त्यावरुन इम्रान खान यांनी मोदींना लक्ष्य केले.

भारताच्या केलेल्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱया दिवशी 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने केलेला प्रतिहल्ला परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकचे एफ-16 विमान पाडले होते. मात्र, पाकच्या ताब्यातील सर्व एफ-16 विमाने सुरक्षित असल्याचा दावा अमेरिकन मासिकाने केला होता. अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडण्याच्या मुद्यांवरूनच भाजपाला निवडणुका जिंकायच्या आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱयांनी मोदींचे हे प्रयत्न परतून लावले आहेत, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

Related posts: