|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » leadingnews » काँग्रेस विरोधीपक्षात असले की त्यांचे महत्त्व कळते : राज ठाकरे

काँग्रेस विरोधीपक्षात असले की त्यांचे महत्त्व कळते : राज ठाकरे 

मोदी-शहांचे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करणार

ऑनलाईन टीम / मुंबई :

हे वर्षे तुम्हाला मोदीमुक्त भारताचे जावो, अशा शुभेच्छा देतो. पुढील दिवसांत राज्यात 8 ते 10 सभा आहेत. काही दिवस माध्यमांमध्ये आणि भाजपात कुजबुज सुरू आहे. राज ठाकरेला काँग्रेस राष्ट्रवादी वापरून घेतायेत इतका वेडा नाही मी, मध्यमातून अनेक बातम्या येत होत्या. मी त्यांच्याशी काही बोललेलो नाही. तुम्हाला हवे का नको त्यापेक्षा मला तुमच्या सोबत यायचे की नाही ते महत्त्वाचे मोदी-शहा यांचे आलेले संकट दूर करण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करणार त्याचा फायदा यांना झाला तर झाला. ज्या ज्यावेळी देश संकटात आला आहे, त्यावेळी काँग्रेसला आरएसएससह सर्वांनी पाठिंबा दिला आहे. ज्यावेळी देश संकटात आला त्यावेळी वेगळा विचार करणे गरजेचे असते. जिथे भाजपचा उमेदवार आहे, तो सेनेला नको, पण जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तो भाजपला नको. या माझ्या पाठिंब्याचा विधानसभेच्या निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. म्हणून यांना सत्तेत येऊ द्यायचे नाही.

प्रतिभाताई पाटलांसाठी बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. पाच वर्षे मोदी शहा ज्याप्रकारे वागले तर मी असे केले नसते. आज पंतप्रधानांची जगात ओळख फेकू अशी आहे. आमेरीकेच्या विमान न पाडल्याच्या विधानावर मोदींनी उत्तर द्यावे का खोटे बोलत आहात. मोदींना काय संधी होती. देशाचा पंतप्रधान होण्याचे अनेकांचे स्वप्न होते. परंतु होता आले नाही अडवाणींचे उदाहरण घ्या. मोदींनी पाच वर्षात एक पत्रकार परिषद घेतली नाही. कसली भीती वाटते. पंतप्रधान होण्या आगोदर मी गुजरातमध्ये गेलो तेव्हा ठिक होते सर्व, पण सतत माझ्यासोबत एसपी,कलेक्टर असायचे मोदींच्या कामाबाबत सांगायचे. त्यावेळी जे स्वप्न दाखवले गोष्टी दाखवून लोकांवर छाप पाडली, त्या खोटय़ा होत्या. राहुल गांधी जे बोलतात ते खेरे आहे. सत्तेत असताना आपण त्यांना शिव्या देतो. विरोधी पक्षात आपण बसल्यावर कळते काँग्रेस योग्य आहे. सत्तेत आल्यावर कळाले मोदींना आई आहे, वर्षातून एकदा आईला भेटायला जाताना कॅमेरे घेऊन जातात. आम्ही कधी जात नाही, माझ्या घरी देखील आई आहे. किती थापा मारल्या, पण पंतप्रधान झाल्यावर ज्या गोष्टी आणल्या त्याला मोदींनी आधी विरोध केला होता. काँग्रेसच्या जुन्या सर्व योजना होत्या त्यांची नावे मोदींनी बदलली. मला काँग्रेस वाल्यांचे देखील कळत नाही,आणि भाजपचे देखील कळत नाही. योजनांसाठी तुमचीच माणसे आठवतात का इतर नावे नाहीत का आपल्या देशात इतकी कर्तुत्त्वावान माणसे झाली त्यांची नावे का द्यावीशी वाटत नाही. असा सवाल राज यांनी यावेळी केला. आधार कार्डला विरोध करणाऱयांनी पुन्हा तीच योजना का आणली. गंगा साफकरण्यासाठी 20 हजार कोटी रूपये कुठे गेले माहिती नाही. जी.डी. अग्रवाल उपोषणाला बसले होते, पण त्यांना मोदी भेटले नाहीत. ते वाराणसीत उपोषणाला बसले होते. स्वच्छ गंगा कमिटीच्या एकाही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. माध्यमांना दाबले जात आहे. युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण केली, आरडीएक्स आले कोठून तुम्ही आधी विचारत होतात, आज आमचा प्रश्न तुम्हाला आहे आरडीएक्स आले कोठून. कश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तीसोबत युती का केली. यांच्या सरकारनंतर कश्मीची परिस्थिती बिकट झाली. वाढदिवसाला नवाज शरीफला भेटायला गेले आणि काही दिवसांत पठाणकोट मग उरी आणि पुलवामा झाले. ऐअर स्ट्रईक केले 3.30 सकाळी जाहिर केले अमित शहाने तुम्हाला कोठून कळाले. 200 ते 250 लोक मारली असती तर अभिनंदनला सोडला नसता. मोदी एका प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार नाहीत.

Related posts: