|Friday, August 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » नीना कुळकर्णी साकारणार ‘स्वप्नील जोशी’च्या आईची भूमिका

नीना कुळकर्णी साकारणार ‘स्वप्नील जोशी’च्या आईची भूमिका 

‘जीसिम्स’ निर्मित श्रावणी देवधर दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ 14 जून रोजी होणार प्रदर्शित होणार आहे. ‘जीसिम्स’च्या अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’मध्ये हिंदी व मराठी चित्रपटसफष्टी गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी या स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत.

नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरवर स्वप्नील जोशी आपल्या आईच्या म्हणजेच नीना कुळकर्णी बरोबरचा लुक आणि ‘आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ’ असे सुंदर वाक्य लिहिले आहे; जे आई आणि मुलामधील जिव्हाळय़ाचे नाते अधोरेखित करत आहे.

नीना कुळकर्णी सांगतात, ‘मी सेटवर काम करत असताना खूश होते. कारण, या चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी माझी जुनी मैत्रीण आहे. स्वप्नील जोशीबरोबर पुन्हा 14 वर्षांनी काम करायला मिळाले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये मी काम केले आहे. त्यामुळे यांच्याबरोबर पुन्हा काम करायला मजा आली. ‘मोगरा फुलला’ ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. या कथेमधील माझे पात्र साकारताना मला खूप समाधान मिळाले.

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी याच्याबरोबर साई देवधर, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.