|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » ‘टकाटक’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

‘टकाटक’चे पहिले पोस्टर प्रदर्शित 

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षाचा शुभारंभ… साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवशी सर्वत्र नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत होत आहे. याच उत्साहमयी वातावरणात काहीशा वेगळय़ा वाटेने जाणाऱया ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

नूतनवर्षाच्या पहिल्या सायंकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक’चे फर्स्ट पोस्टर मराठी रसिकांच्या भेटीला आणण्यात आले. आजवर काही महत्त्वपूर्ण आणि यशस्वी मराठी चित्रपटांची निर्मिती करणाऱया पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गाववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली ‘टकाटक’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘येडय़ांची जत्रा’ ‘इडियट्स’ ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘1234’ या करमणूकप्रधान चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱया मिलिंद कवडे यांनी ‘टकाटक’चे दिग्दर्शन केले आहे. मिलिंद कवडे आणि अजय ठाकूर यांनी या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहिली असून संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. ‘टकाटक’च्या पोस्टर जोडीला 28 जून ही चित्रपट प्रदर्शनाची तारीखही घोषित केली आहे. या चित्रपटात एका वेगळय़ा धाटणीची सेक्स कॉमेडी प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. फुल टू कमर्शियल चित्रपट असलेल्या ‘टकाटक’मध्ये मनोरंजनाचे सर्व मसाले आहेत. प्रेमकथेसोबतच एक महत्त्वपूर्ण संदेशही ‘टकाटक’च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजतागायत बऱयाच आशयघन चित्रपटांची यशस्वी निर्मिती करत मराठी सिनेसृष्टीच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱया ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रवींद्र चौबे यांनी ‘टकाटक’ची निर्मिती केली आहे.