|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवगड कॉलेजमध्ये स्वयंसिद्धा स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर

देवगड कॉलेजमध्ये स्वयंसिद्धा स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर 

वार्ताहर / देवगड:

 कुटुंबाबरोबर समाजाची उन्नती ही स्त्राrवरच अवलंबून आहे. स्त्राrमुळेच आजच्या कुटुंबाची परिपूर्ण व्याख्या शक्मय होणार आहे, असे मत येथील महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे यांनी व्यक्त केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय-सिंधुदुर्ग यांच्यावतीने देवगड महाविद्यालयात दहा दिवशीय स्वयंसिद्धा  महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन प्राचार्या डॉ. जांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वयंसिद्धाचे प्रशिक्षक शेवंता नाईक, जयश्री कसालकर, तेजस्वी पडेलकर, क्रीडाधिकारी रोहिणी मोकाशी आदी उपस्थित होत्या. डॉ. जांबळे म्हणाल्या, आजच्या पिढीतील महिलांनी संकुचित मनोवृत्ती न ठेवता स्वतःला सिद्ध करून स्वतःची प्रगती स्वतःच साधली पाहिजे. अशा प्रकारच्या शिबिरातून मिळणारे शिक्षण हे त्यांना स्वयंसिद्धा होण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक क्रीडाधिकारी रोहिणी मोकाशी यांनी केले.

शिबिरात मार्गदर्शनपर व्याख्याने

शिबिरामध्ये सुमारे 35 महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत. या शिबिरात स्त्रियांना कायदेविषयक, आरोग्यविषयक, शारीरिक समस्या, स्वच्छता, स्त्रियांच्या समस्या, मानसिक आरोग्य, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदींवर मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तसेच विविध कवायत प्रकार प्रशिक्षणार्थींना शिकविण्यात येणार आहेत.

दरम्यान, सहभागी प्रशिक्षणार्थींची देवगड ग्रामीण रुग्णालय येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी केली जाणार आहे. शिबिराचे आयोजन जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.