|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विश्वासार्हतेच्या बळावरच समाजहिताचा ध्यास

विश्वासार्हतेच्या बळावरच समाजहिताचा ध्यास 

किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : ‘तरुण भारत’ व ‘लोकमान्य’च्या माध्यमातून समाजकार्याचा वसा तेवत ठेवणार

प्रतिनिधी/कोल्हापूर

‘तरुण भारत’चे समूह प्रमुख, सल्लागार संपादक व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांचा रविवार, 7 एप्रिल रोजी 67 वा वाढदिवस, ‘तरुण भारत’ची शताब्दी आणि लोकमान्य सोसायटीचा वर्धापन असा त्रिवेणी सुवर्णक्षण घेऊन आलेला सोहळा मोठय़ा दिमाखात पार पडला. सर्किट हाऊस रोड, लाईन बाजारजवळील ‘महासैनिक दरबार हॉल’मध्ये झालेल्या या सोहळय़ावेळी किरण ठाकुर यांना शुभेच्छा देण्यासाठी कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कणेरीच्या सिद्धगिरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज, हिंदकेसरी दिनानाथ सिंह, पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता कृती समितीचे अध्यक्ष शिवगोंडा खोत, महान भारत केसरी पै. दादू चौगले, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

या सुवर्णक्षणी बोलताना किरण ठाकूर म्हणाले, 1921 साली मासिक, 1928 साली साप्ताहिक सुरु केले. 1966 साली पाच पैसे किमतीने वृत्तपत्र विकले. आज तेच वृत्तपत्र आम्ही गोव्यात सर्वात महाग  आठ रुपये किमतीने विकत आहोत. वाचक आणि ‘तरुण भारत’च्या पुण्याईने तरुण भारत वाढला. यामुळे आज हा दिवस पहात आहोत असे ते म्हणाले. आज तरुण भारतचा विस्तार झाला आहे. बेळगाव कारवारवर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण महाराष्ट्राचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. मात्र आज ना उद्या सीमा भाग महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी बाबुराव ठाकुर यांनी प्रयत्न केले, तेच आपण चालू ठेवले. तरुण भारतचा दबदबा बेळगांव, सीमाभागापुरता मर्यादित राहिला नाही तर पूर्ण देशभर दबदबा झाला.

वृत्तपत्राचे कार्य मोठे असते.अन्यायाविरुध्द झुंज आणि लोकशिक्षणासाठी तरुण भारतने कार्य केले. आज तरुण भारतच्या माध्यमातून लोकमान्य को ऑप सोसायटी उभी राहिली. ही सोसायटी भारतात प्रथम क्रमांकावर पोहचली आहे.220 पेक्षा अधिक शाखा दोन हजार लोकांच्या सहकार्याने सुरु आहेत. 30 ते 40 हजार लोकांना या संस्थेचा फायदा मिळाला आहे. आजपर्यंत संस्थेविषयी एकही तक्रार नाही.पूर्वी शिक्षण संस्था चालवण्यासाठी देणग्या मागायला जात होतो, पण आज आम्ही शिक्षण संस्थांना देणग्या देत आहोत हा फरक आहे.

अदृश्य काडीसिध्देश्वर स्वामींचे कार्य मोठे असून त्यांच्या कार्याला एक कोटीची देणगी जाहीर करत असल्याचे सांगितले. कोल्हापूरातील कुस्ती स्पर्धेसाठी लोकमान्यच्या वतीने दरवर्षासाठी 20 लाख जाहीर केले. फुटबॉल हा  कोल्हापूरकरांच्या आवडीचा खेळ आहे. भारतात मोहन बगानचे नाव सर्वदूर आहे.  कोल्हापूरातील  फुटबॉल वाढण्यासाठी 20 लाख जाहीर केले.तसेच कोल्हापूरात दीड कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक व्यायामशाळा सुरु करण्याची घोषणा केली.  कोल्हापूरातून लोकमान्यमध्ये पाचशे कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. यामुळे आमची सामाजिक बांधिलकी आहे.ही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊनच आम्हाला मिळणारा फायदा समाजापर्यंत पोहचवायचा ही दृष्टी पहिल्या दिवसापासून ठेवली आहे.त्यामुळे ओला, सुकाळ दुष्काळात अनेक ठिकाणी मदतीचा हात पुढे केला आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीसाठी तीन वर्षापूर्वी 50 लाख रुपये  दिले.गोवा,कर्नाटक मुख्यमंत्र्यांनाही निधी दिला. लातूरच्या भूकंपानंतर त्याठिकाणी बेळगाच्या वतीने शाळा बांधून देण्यात आली. तरुण भारत व लोकमान्यचे असे अनेक उपक्रम सुरु आहेत. बेळगांवात शिवजयंतीसाठी अनेक वर्षापासून देणग्या देत आहोत.गणेशोत्सवासाठी बेळगांवस पुण्यालाही 50 लाखाच्या देणग्या देत आहोत.. लोकमान्यांचे नाव घेऊन ही संस्था उभी राहिली असून ही संस्था प्रामाणिकपणे काम करत आहे.तुम्ही प्रामाणिकपणे आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाला पत्रकार म्हणून  तडा जावू दिला जाणार नाही.अनेक संस्था अडचणीत आल्या त्यावेळी आमची परीक्षा घेतली, पण त्या परीक्षेत आम्ही पास झालो.

केवळ एका उद्योगापुरते मर्यादित नाही. अनेक रिसॉर्टस चालवतो.बांधकाम व्यवसायातील कंपन्यांना मदत केली आहे. मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई असे देशातील पहिले पर्यटक जहाज सुरु केले. लोकमान्येच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य सुरु आहेत. लोणावळयात लोकमान्येच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरेच्या मार्गदर्शनातून भव्य थिएटर उभा राहत आहे. जयराम शिलेदार यांच्या नावाने नाटय़गृह उभा राहत आहे. अशा अनेक उपक्रमांना लोकमान्येने चालना दिली आहे.

आज वृत्तपत्र चालवणे कठीण आहे. अशा खडतर  परिस्थितीत तरुण भारत सुरु ठेवला आहे. वृत्तपत्र किंमत वाढवल्याशिवाय चालवणे कठीण आहे. यामध्ये काही लोकांनी स्पर्धा सुरु केली आहे. ही स्पर्धा जीवघेणी आहे. आज ना उद्या प्रत्येक वृत्तपत्राला किंमत वाढवावी लागेल असे ठाकुर म्हणाले.

Related posts: