|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठीच धाड मारण्याचे षडयंत्र

निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठीच धाड मारण्याचे षडयंत्र 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली ः   निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठीच धाड मारण्याचं षडयंत्र रचलं जात असून आम्ही या ‘सर्च पार्टी’चं स्वागत करत आहोत, अशी खोचक टीका चिदंबरम यांनी केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने धाडी मारल्यानंतर काँग्रेसचे ज्ये÷ नेते पी. चिदंबरम यांनी त्यावर टीका केली आहे.

चिदंबरम यांनी ट्विट करून आयकर विभागाकडून होत असलेल्या धाडसत्रावर टीका केली आहे. आयटी विभाग शिवगंगा आणि चेन्नईमध्ये माझ्या घरावर धाड मारणार असल्याचं मला समजलं आहे. आम्ही या सर्च पार्टीचं स्वागत करतो. आमच्याकडे लपविण्यासारखं काहीच नाही, हे आयकर विभागालाही माहीत आहे. आयटी विभाग आणि इतर विभागांनी आमच्या घरी पूर्वीही छापे मारले आहेत. परंतु, त्यांना काहीच मिळालं नाही.