|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » निसार तांत्रेला होती पुलवामा हल्ल्याची पूर्वकल्पना

निसार तांत्रेला होती पुलवामा हल्ल्याची पूर्वकल्पना 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची पूर्व कल्पना असल्याची कबुली जैश-ए-मोहम्मदचा सदस्य निसार अहमद तांत्रे याने दिली आहे. त्यामुळे ‘जैश’नेच पुलवामा हल्ल्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

निसार अहमद तांत्रे असे या दहशतवाद्याचे नाव असून, त्याला आठवडाभरापूर्वी युएईनेभारताकडे सोपवले होते. त्याची राष्ट्रीय तपास पथकाकडून (एनआयए) चौकशी करण्यात येत आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘जैश’च्या आदेशानुसारच पुलवामाचा हल्ला झाला होता. त्याचबरोबर खान याने या हल्ल्याचे नेतृत्व केले होते. तांत्रे हा जैशच्या मारल्या गेलेल्या नूर अहमद याचा भाऊ आहे. तो याचवषी 1 फेब्रुवारी रोजी भारतातून पळून गेला होता.

खानने तांत्रे याला सोशल मीडिया ऍपच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती दिली होती. त्यामध्ये खानने म्हटले होते की, फेब्रुवारीच्या मध्यात पुलवामात तो अनेक मोठे स्फोट घडवून आणणार आहे. त्याचबरोबर खानने तांत्रेकडून या हल्ल्यासाठी नियोजन आणि तो प्रत्यक्ष घडवून आणण्यासाठी मदत मागितली होती.

Related posts: