|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात भाजप आमदाराचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात भाजप आमदाराचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / छत्तीसगड :

  छत्तीसगढमधल्या दंतेवाडा जिह्यात एका भाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. या हल्ल्यात भाजप आमदाराचा मृत्यू झाला. तर आमदाराचे पाच सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. भीमा मंडावी असे या आमदाराचे नाव आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वी दिली होती. यानंतर जवानांनी सुरक्षेत आणि बंदोबस्तातही वाढ केली. तरी देखील मांडवी यांच्या ताफ्यावर हा हल्ला झाल्याचे वृत्त एका वृत्त संस्थेने दिले आहे.

 

Related posts: