|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘बापूंच्या कारावासाची कहाणी’ पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन

‘बापूंच्या कारावासाची कहाणी’ पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन 

ऑनलाईन टीम / पुणे :

कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट इंदोर व महाराष्ट्र शाखा, सासवड आणि नगर रस्त्यावरील गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आगाखान पॅलेस यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य ’बा’ अर्थात कस्तुरबा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘बापूंच्या कारावासाची कहाणी’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ाचे आयोजन केले आहे. गुरुवार, दि. 11 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11 वाजता आगाखान पॅलेस येथील कस्तुरबा स्मृती सभागृहात हा प्रकाशन सोहळा होणार आहे. हिंदी लेखिका स्वर्गीय डॉ. सुशीला नायर लिखित मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. शोभनाताई रानडे यांनी केला आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट, इंदोरचे माजी अध्यक्ष धीरूभाई मेहता व समाजसेविका सुनीती रघुनाथ सुलभा यांच्या हस्ते होणार असून, यावेळी कस्तुरबा गांधी नॅशनल ट्रस्टच्या उपाध्यक्षा गायत्रीदास दीदी, ज्ये÷ पत्रकार अरुण खोरे, कस्तुरबा ट्रस्टच्या मंत्री सुरजदिदी डामोर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कस्तुरबा गांधी ट्रस्ट, इंदोरचे अध्यक्ष डॉ. करुणाकर त्रिवेदी असतील, अशी माहिती कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, सासवडच्या शेवंताताई चव्हाण यांनी दिली.

Related posts: