|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘बोलत नाही, करुन दाखवतो’

‘बोलत नाही, करुन दाखवतो’ 

प्रतिनिधी / पुणे :  वाहतूक, पाणी, आरोग्य, नदी सुधारणा आदी महत्त्वाच्या विकासकामांना काँग‘ेसच्या राज्यात राजकीय इच्छा शक्ती अभावाने खिळ बसली होती. केद्र, राज्य व महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर या पायाभूत क्षेत्रात वेगाने विकासकामे सुरू झाली आहेत. म्हणूनच ‘बोलत नाही, करून दाखवतो’ हे महायुतीच्या प्रचाराचे आगामी काळातील सूत्र असेल अशी घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

महापौर टिळक म्हणाल्या, ‘काँग्रेसच्या सत्ता काळात विकास आराखड्याला दहा वर्षे मंजुरी मिळू शकली नाही, शहरातील उपनगरांना जोडणारा एचसीएमटीआर प्रकल्प सुरू होण्यास तब्बल 32 वर्षे प्रतिक्षा करावी लागली, मेट्रोचे काम सुरू होण्यास 13 वर्षे लागली, बसेसची खरेदी अभावानेच झाली, समान पाणीपुरवठा योजना लालङ्गितील अडकली, मुळा-मुठा नदीची गटारगंगा झाली. काँगेस आघाडीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराला दैनावस्था प्राप्त झाली होती.’

महापौर टिळक पुढे म्हणाल्या, ‘भाजप सत्तेत आल्यानंतर विकास आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी मिळाली. यावषी प्रलंबित एचसीएमटीआर प्रकल्पाचे काम सुरू झाले. मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. सुमारे एक हजार बसेस खरेदीची प्रकि‘या सुरू झाली आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 60 साठवण टाक्मयांची कामे पूर्ण झाली आहेत. जायका प्रकल्पाअंतर्गत मुळा-मुठा शुद्धीकरण व नदीकाठ सुधारणांच्या विकासकामांना प्रारंभ झाला आहे. म्हणजेच आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो हेच या विकासकामांतून निदर्शनास येते. हे प्रकल्प मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी बोलत नाही, करून दाखवतो हे आमच्या आगामी प्रचाराचे सूत्र राहणार आहे. प्रचार फेरी, जाहीर सभा, पथनाटय़, सोशल मीडिया या सर्व माध्यमातून आम्ही आक‘मक आणि सकारात्मक प्रचार करणार आहोत.’

 

Related posts: