|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राज्य उत्पादन शुल्कची कारवाई मोहीम

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई मोहीम 

आचारसंहिता कालावधीत दहा ठिकाणी छापे : अडीच लाख किमंतीचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी / बांदा:

लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी छापे टाकून एकूण दोन लाख 35 हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारुबंदी गुन्हय़ांतर्गत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत इन्सुली तपासणी नाका येथे वाहन तपासणीदरम्यान 31 हजार 780 रुपये किमतीची बेकायदा गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली.

निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य उत्पादन विभागाने कडक कारवाईची मोहीम राबविली आहे. महाराष्ट्रगोवा राज्यांच्या सीमेवर बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी गस्ती पथकाची नेमणूक केली आहे. आचारसंहिता कालावधीत तब्बल दहा ठिकाणी छापे टाकून एकूण दोन लाख 35 हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गोवा बनावटीचे मद्य, काजू फेणी, दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी वाहने यांचा समावेश आहे.

ही कारवाई इन्सुली तपासणी नाक्मयाचे निरीक्षक शिवाजी काळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सी. एल. कदम, एस. एम. साळुंखे, आर. डी. चंदुरे यांच्या पथकाने केली. यापुढे खासगी बस व वाहनातून नेण्यात येणाऱया बेकायदा मुद्यावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे निरीक्षक काळे यांनी सांगितले.