|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » प्रदूषण नियंत्रण, लंडनने दाखविला मार्ग

प्रदूषण नियंत्रण, लंडनने दाखविला मार्ग 

जगातील पहिले अल्ट्रा लो एमिशन झोन ठरले शहर

वृत्तसंस्था/  लंडन

ब्रिटनची राजधानी लंडन 24 तास, आठवडय़ातील सातही दिवस अल्ट्रा लो एमिशन झोन (युएलईझेड) लागू करणारे जगातील पहिले शहर ठरले आहे. आता या शहरात धावणाऱया वाहनांना कठोर उत्सर्जक मानकांचे पालन करावे लागणार आहे. या मानकांचे उल्लंघन केल्यास वाहनांवर मोठा दंड ठोठावला जाईल. प्रदूषणाशी झगडणाऱया जगाला लंडन शहराने एक नवा मार्ग दाखविला आहे. विशेषकरून दिल्लीसाठी हा धडा ठरू शकतो.

लंडनमध्ये अल्ट्रा लो एमिशन झोनची सुरुवात फेब्रुवारी 2017 मध्येच झाली होती. यांतर्गत लंडनच्या सिटी सेंटरमध्ये अत्याधुनिक प्रदूषण पसरविणाऱया वाहनांवर अतिरिक्त शुल्क ठोठावण्याची तरतूद करण्यात आली होती. याच्या प्रभावामुळे या झोनमध्ये प्रवेश करणाऱया वाहनांच्या संख्येत मोठी घट झाली. सुमारे 11 हजार वाहने दरदिनी कमी झाल्याने विषारी वायूत सुमारे 55 टक्क्यांची घसरण झाली आहे. युएलईझेड लंडनची हवा स्वच्छ करण्याच्या योजनेचा दुसरा टप्पा असून याला टी-चार्ज असे नाव देण्यात आले आहे. या प्रयत्नांनुसार लंडनमध्ये लाल बससेवेचा विस्तार केला जाणार आहे. ऑक्टोबर 2020 पर्यंत लंडनमधील सुमारे 9200 वाहने युएलईझेडच्या मानकांची पूर्तता करतील.

अल्ट्रा लो एमिशन झोन

मध्य लंडनमध्ये 8 एप्रिलपासून अल्ट्रा लो एमिशन झोन लागू झाला आहे. लंडनमध्ये वायू प्रदूषण कमी करण्याच्या उपायांपैकी हा एक निर्णय आहे. याकरता लंडनच्या वाहतूक विभागाने एक संकेतस्थळ निर्माण केले असून त्यावर नव्या नियमांची माहिती अंतर्भूत आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून वाहन अद्ययावत आहे की नाही हे समजणार आहे.

मोठा दंड भरावा लागणार

नव्या कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन केल्यास मोठय़ा दंडाची तरतूद आहे. दंडाच्या कक्षेत चारचाकी वाहनांसह दुचाकींचाही समावेश करण्यात आला आहे. प्रदूषण फैलावणाऱया वाहनांना रोखणे हा यामागचा उद्देश आहे. नव्या कायद्यात दंड 2 शेणींमध्ये विभागण्यात आला आहे. पहिल्या शेणीत कार, व्हॅन, ट्रक आणि बाइकचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱयाकडून 16 डॉलर्सचा दंड वसूल केला जाईल. दुसऱया श्रेणीत अवजड वाहनांचा समावेश असून यात ट्रक, बस आणि कोच सामील आहे. नियमांचा भंग केल्यास त्यांच्याकडून 130 डॉलर्स म्हणजेच 100 पौंडचा दंड वसूल केला जाईल.

Related posts: