|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ‘टीक टॉक’ बंदीबाबत सोमवारी सुनावणी

‘टीक टॉक’ बंदीबाबत सोमवारी सुनावणी 

बंदी आदेशाविरोधात याचिका

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशातील तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ‘टीक टॉक’ ऍपवरील बंदी निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर 15 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नुकताच मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या ऍपवर बंदी घालण्यात यावी, असा आदेश केंद्र सरकारला दिला होता. सरन्यायाधीश राजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीश दीपक गुप्ता आािण्  संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी होईल.

टीक टॉक हे चायनीज कंपनीचे ऍप आहे. याच्या माध्यमातून चित्रपट संवांदापासून ते विनोद आणि नृत्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल केले जातात. विशेषत: भारतामध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहे. कोटय़वधी ग्राहक त्याचा वापर करतात. मात्र यामुळे लैंगिक गुन्हय़ांसह संस्कृतीचा ऱहास, आत्महत्येच्या प्रकारात वाढ असे प्रकार होत असून, यावर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका तामिळनाडूतील सामाजिक कार्यकर्ते मुथू कुमार यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर मदुराई खंडपीठासमोर सुनावणी झाली. टीक टॉक ऍप पोर्नोग्राफीला उत्तेजन देत असल्याचे ठपका ठेवत त्यावर केंद्र सरकारने बंदी घालावी, असा आदेश खंडपीठाने दिले आहे. आता याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे ऍप वापरकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.

Related posts: