|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताची इंडोनेशियावर बाजी

भारताची इंडोनेशियावर बाजी 

वृत्तसंस्था/ बँकॉक

येथे झालेल्या कनिष्ठांच्या आशिया ओसेनिया डेव्हिस चषक पात्र फेरीच्या लढतीत भारताने इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या लढतीत भारतीय संघातील अजय मलिकने एकेरी आणि दुहेरीचे सामने जिंकले. पहिल्या एकेरी सामन्यात अजय मलिकने इंडोनेशियाच्या गुणवानचा 6-4, 6-2 असा पराभव केला. त्यानंतर भारताच्या सुशांत देबासने इंडोनेशियाच्या ऍगेत्राचा दुसऱया एकेरी सामन्यात पराभव केला. पुरूष दुहेरीच्या सामन्यात अजय मलिक आणि गेहलोत या भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या ऍगेत्रा आणि कुर्निवान यांचा 6-7 (6-8), 6-2, 10-4 असा पराभव करून इंडोनेशियाचे आव्हान संपुष्टात आणले. आता या गटात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर भारताची पुढील लढत होणार आहे.