|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे-पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपत प्रवेश निश्चित

मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे-पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपत प्रवेश निश्चित 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपप्रवेश आता निश्चित झाला असून, अहमदनगरमध्ये 12 एप्रिलला होणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. तर 17 एप्रिल रोजी अकुलज येथे होणाऱया मोदींच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आधीच भाजप प्रवेश केला आहे. मुलांच्या प्रवेशानंतर आता हे पितादेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश महाआघाडी मोठा धक्का मानला जात आहे.

Related posts: