|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » विविधा » मिसळ दरबारच्यावतीने  ‘मिसळ डे’ आयोजन

मिसळ दरबारच्यावतीने  ‘मिसळ डे’ आयोजन 

 पुणे / प्रतिनिधी :

ज्याप्रमाणे परदेशी खाद्यपदार्थांचे डेज साजरे केले जातात त्याच प्रमाणे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचे डेज देखिल साजरे करण्यात यावे या अनुशंगाने मिसळ दरबार तर्फे येत्या 12 एप्रिलला ‘मिसळ डे’ साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती मिसळ दरबारचे सचिन विंचवेकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जोपासणे आणि त्या खाद्य संस्कृतीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकीकता मिळवून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या शंभर वर्षांपासून मिसळवर प्रेम करणारे ग्राहक आहेत, व ग्राहकांचे मिसळवरचे प्रेमही कमी झालेले नाही. सध्या नवीन पिढीने मिसळ व खाद्यसंस्कृती (महाराष्ट्र खाद्यसंस्कृती) जोपासली पाहिजे. आपल्या मराठी खाद्यपदार्थांकडे वळले पाहिजे या हेतुने दि. 12 रोजी ‘मिसळ डे’च्या निमित्ताने मिसळ दरबारच्या सर्व शाखांवर एका मिसळवर एक मिसळ मोफत देण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.