|Sunday, December 8, 2019
You are here: Home » Top News » जालियनवाला बाग हात्याकांड ब्रिटीश भारतीय इतिहासातील आमची चुकी : थेरेसा मे

जालियनवाला बाग हात्याकांड ब्रिटीश भारतीय इतिहासातील आमची चुकी : थेरेसा मे 

ऑनलाईन टीम / लंडन : 

जालियनवाला बाग हात्यांकांडात झालेल्या मनुष्यवध हा ब्रिटीश इतिहासातील सर्वात लज्जास्पद होते. या हात्याकांडाच्या शंभराव्या वर्षे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी याची माफी मागितलेली आहे. येत्या 13 एप्रिलला जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे होत आहेत. यामुळे ब्रिटच्या प्रधानमंत्र्यांनी या घटनेचा खेद व्यक्त करत ही ब्रिटनची एक चुकी असल्याचे त्यांनी नमूद केले. 1919 मध्ये जालियवालाबाग हत्याकांडाची जी घटना घडली ती ब्रिटीश भारतीय इतिहासातील अत्यंत लज्जास्पद घटना असून तो आमच्यावर एक डाग आहे. असेही प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी सांगितले. याआधी 1997मध्ये राणी ऐलिजाबेथ दुसरी यांनी देखील ही घटना अत्यंत दुःखदायक असल्याचे उदाहरण दिले होते.   

Related posts: