|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » डिजिटलायजेशन सेवेमुळे देशात सुधारणा : आयएमएफ

डिजिटलायजेशन सेवेमुळे देशात सुधारणा : आयएमएफ 

फिस्कल मॉनिटरी रिपोर्टमध्ये माहिती स्पष्ट : 17 टक्के खर्चात कपात

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

भारतात डिजिटल सेवेचा वाढता वेग आणि त्यातून होत असणारे फायदे यामध्ये अलिकडच्या काळात फायदे होत असल्याचे अनुमान आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष(आयएमएफ) यांच्याकडून नोंदवण्यात आले आहे. यात आर्थिक व्यवहार  करताना होत असणाऱया फसवणुकीतही काही प्रमाणात घट झाल्याचे आयएमएफने बुधवारी सादर करण्यात आलेल्या फिस्कल मॉनिटरी रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

ई-प्रोक्योरमेंट वापरात सुधारणा

भारतात सामाजिक सहाय्यता कार्यक्रम चालविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्लेटफॉर्म वापरला जातो आहे. यामुळे नियमीतपणे होणाऱया खर्चात 17 टक्क्यांनी घट झाल्याची नोंद करण्यात आली. तर यातून अन्य विविध प्रकारचे फायदे घेता आल्याचे म्हटले या अहवालात स्पष्ट करण्यात आले. आंध्रप्रदेश मधील स्मार्ट आयडी कार्डच्या माध्यमातून माहिती लिंक होण्याच्या घटनांमध्ये जवळपास 41 टक्क्यांनी कमी आल्याची माहितीही देण्यात आली आहे. 

ई-प्रोक्योरमेंटने स्पर्धेत वाढ

भारतात ई-प्रोक्योरमेंटची सुरुवात करण्यात आल्याने स्पर्धा आणि कंन्स्ट्रक्शनची गुणवता यामध्ये सुधारणा होत गेल्याचे आयएमएफने म्हटले आहे. हा अनुमान सार्वजनिक प्रोक्योरमेंटवर आयएमने केलेल्या अभ्यासावर नोंदवण्यात आलेल्या माहितीमधून समोर आले आहे. याची प्रक्रिया म्हणजे उत्पादनाची किंमत आणि गुणवता यांच्यावर प्रभाव टाकण्याची शक्यता ही मांडली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून देशातील प्रमुख ऑडिट संस्थाने, संसद आणि समाजाच्या जागृकतेमुळे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी मदत मिळाली आहे.  त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि जनतेचे प्रतिनिधीची जबाबदारीही वाढली असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ऑडिटवर लक्ष केंद्रीत करत भ्रष्टाचार रोखण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी स्पष्टीकरण आयएमएफने दिले.

Related posts: