|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » विदर्भात भर उन्हातही मतदानाचा उत्साह

विदर्भात भर उन्हातही मतदानाचा उत्साह 

ऑनलाईन टीम / नागपूर :  लोकशाहीच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. भर उन्हातही विदर्भात मतदानाचा उत्साह पहायला मिळत आहे. विदर्भात  दुपारी 1  वाजेपर्यंत मतदानाचा टक्का पुढीलप्रमाणे

यवतमाळ-वाशिम 26.01 , चंद्रपूर 30.05 , भंडारा गोंदीया 33.40 टक्के, गडचिरोली-चिमुर 18.01, वर्धा 30.22 टक्के, नागपूर- 27.44, रामटेक-23.19

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी देखील पत्नी आणि आई सोबत येऊन मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्र्यांच्या याच मतदान केंद्रावर सकाळी व्हीव्हीपॅड मशीलमध्ये तांत्रीक अडचण झाली होती. मुख्यमंत्री मतदान केंद्रावर पोहोचताच सेल्फीसाठी लोकांनी गर्दी केली.

मतदानानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी आणि माझ्या परिवाराने मतदान केले. भारताच्या लोकशाहीत निवडणूक ही महत्त्वाची प्रक्रिया पुढील पाच वर्षात देशाचा कारभार सक्षम आणि मजबूत सरकारच्या हातात देण्यासाठी मतदान महत्त्वाचे सर्वांनी देशात मजबूत सरकार आणण्यासाठी मतदान करावे.

 

 

Related posts: