|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » प्रा. विजय देव यांचे निधन

प्रा. विजय देव यांचे निधन 

 

 पुणे / प्रतिनिधी :  राज्यशास्त्राचे विद्याार्थीप्रिय प्राध्यापक, लेखक आणि सर परशुरामभाऊ महाविद्याालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय प्रल्हाद देव (वय 78) यांचे हृदयविकाराच्या झटक्मयाने बुधवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, दोन मुली, जावई आणि नातू असा परिवार आहे. ते दिवंगत ज्ये÷ साहित्यकि गो. नी. दांडेकर यांचे जावई आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे वडील होत. विजय देव यांच्या अंतिम इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्यशास्त्राचे अभ्यासक, लेखक म्हणून डॉ देव परिचित होते. स. प. महाविद्याालयात राज्यशास्त्र विषयाचे 35 वर्षे अध्यापन केले. दोन वर्षे प्राचार्यपद भूषवून ते निवृत्त झाले. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, दुर्गसंपदा अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केले. गोनीदांच्या विविध साहित्यकृतींच्या अभिवाचनाची संस्कृती त्यांनी रूजविली. गोनिदा दुर्गप्रेमी मंडळाचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. या मंडळातर्फे दरवषी दुर्ग साहित्य संमेलनासह दुर्ग जागरणाचे विविध उपक्रम त्यांनी राबविले. मृण्मयी प्रकाशन संस्थेचे ते संचालक होते.

राज्यशास्त्र अभ्यास मंडळ, विद्वत सभा, सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाच्या अधिसभेचे ते सदस्य होते.