|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » बेसिक डीमॅट खात्याचा देखभाल खर्च एक लाखापर्यत माफ

बेसिक डीमॅट खात्याचा देखभाल खर्च एक लाखापर्यत माफ 

नवीन नियम 1 जुनपासून लागू : विमाधारक 1 जुलैला आपला स्टेटस पाण्याची सोय उपलब्ध

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बेसिक सर्व्हिस डीमॅट खात्याची वर्षभर देखभाल करण्यात येणाऱया खर्चात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बेसिक डीमॅट खात्यावर जर 1 लाख रुपयेपर्यंत डेट सिक्युरिटी(बाण्ड) ठेवण्यात आल्यावर त्यावर आकारण्यात येणार देखभालीचा खर्च आकाण्यात येणार नसल्याचे सेबीने म्हटले आहे. तर एक दोन लाख रुपयाची बॉण्ड ठेवण्यात आल्यावर देखभाल खर्च 100 रुपये आकारण्यात येणार असून हा नवीन बदल 1 जूनपासून लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

गुंतवणूक बाजाराला चालना

हा नवीन बदल गुंतवणूक बाजारातील गुंतवणूकदारांची भागीदारी वाढविण्यासाठी हा मार्ग सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी 50 हजार रुपयाची सुरक्षा म्हणून करण्यात येणाऱया खात्यावर कोणताही खर्च लावला जाणार नाही. 50 हजार ते दोन लाख रुपयापर्यतच्या डीमॅट खात्याची देखभाल करण्यास वर्षाला 100 रुपयाचा खर्च आकारला जातो.

सेबीने दिलेल्या निर्णयावर गुंतवणूकदारांनी आपला सहभाग घेत 2012मध्ये बेसिक सर्व्हिस खात्याची सुविधा सुरु केली होती. यांचा उद्देश किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारासाठी डीमॅट खात्यात बॉण्ड आणि शेअर ठेवले जातात त्याचा देखभालीचा खर्चातील रक्कम घटविण्याचा हा होता.

 विमाधारकांना जुलैपासून सुविधा

आपल्या ग्राहकांसोबत आपण स्वच्छ आणि प्रमाणिक व्यवहार करण्यासाठी आपण कार्यरत राहिले पाहिजे. यात कोणत्याही विमा धारकांनी आपला विमा उतरल्यास त्या व्यवहारची सर्व माहिती मिळण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला असल्याचे विमा रेग्युलेटर इरडा यांनी सांगितले आहे.

Related posts: