|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते ‘लोकराज्य’ पुस्तकाचे प्रकाशन

जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते ‘लोकराज्य’ पुस्तकाचे प्रकाशन 

राष्ट्रीय महोत्सव : मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज

प्रतिनिधी/ कोल्हापूर

‘लोकराज्य’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. गांधी मैदान येथे आयोजीत केलेल्या मानवी रांगोळी उपक्रमाच्या कार्यक्रमात सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्कच्या वतीने   एप्रिल व मे महिन्याचा ‘लोकराज्य राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज’ या पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रकाशीत केलेल्या या लोकराज्य पुस्तकामध्ये लोकशाहीचा महोत्सव या सदरात 2019 चा निवडणूक कार्यक्रम, विश्वासपात्र व पारदर्शक या सदरामध्ये यंदा प्रथमच वापरण्यात येणाऱया व्हीव्हीपॅट यंत्राबाबत माहिती, स्वीप कार्यक्रमामधून मतदान जनजागृती माहिती, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱया प्रशिक्षणाची सविस्तर माहिती, मतदान प्रक्रियेविषयी सारे काही मतदारांसाठी हे सदर असून पेडन्यूज, समाज माध्यमे तसेच  जाहिरात प्रमाणिकरण आदींविषयी पुस्तकात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच सदैव दक्ष तिसरा डोळा या सदरात सी व्हीजील ऍप, आचारसंहिता पालनाबरोबरच 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणूकीतील सर्व मतदार संघाची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या पुस्तकात या दोन्ही निवडणूकीतील एकूण मतदार, एकूण झालेले मतदान आणि प्रमुख पक्षाचे उमेदवार व त्यांना मिळालेल्या मतांचा समावेश आहे. जिल्हा माहिती अधिकारी यांनी स्वागत करुन  ‘राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज’ या एप्रिल, मे महिन्याच्या लोकराज्य अंकाविषयी माहिती दिली.