|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनवर दबाव

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनवर दबाव 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्सकडून चीनवर दबाव वाढवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सर्व सदस्य देशांचा याबाबतच्या प्रस्तावाला पाठींबा आहे.

या प्रस्तावाला चीनकडून काही प्रमाणात अडथळे येत आहेत. त्यावर ब्रिटन आणि फ्रान्सने तांत्रिक बाबींद्वारे या प्रक्रियेत बाधा आणू नये, असे चीनला सुनावले आहे. या प्रस्तावावर 23 एप्रिलपर्यंत सकारात्मक भूमिका घ्यावी, असा अल्टिमेटमही चीनला देण्यात आला आहे.

Related posts: