|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » दिलीप गांधी संतापले

दिलीप गांधी संतापले 

 

ऑनलाईन टीम / अहमदनगर : लोकसभेच्या अहमदनगर मतदारसं घातील भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत त्याचवेळेस जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी गांधींना भाषण करण्यापासून रोखल्याने दिलीप गांधी हे प्रचंड संतापले. मला दोन मिनिटे बोलू देत, अश शब्दात बेरड यांना सुनावले.

सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधन मोदींची अहमदनगरमध्ये सभा घेण्यात आली. मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यां®ाs व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी राज्यातील, तसेच स्थानिक नेत्यांची भाषणं झाली. खासदार दिलीप गांधी हे व्यासपीठावर भाषण करण्यासाठी आले. ते भाषणातून विकासकामांबद्दल जनतेला माहिती देत होते. त्याचवेळी जिल्हाध्यक्ष बेरड यांनी त्यांना अर्ध्यावरच भाषण थांबावायास सांगितलं. त्यावर दिलीप गांधी हे प्रचंड चिडले. मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही, असं म्हटलं जातं. पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळं काही आहे, असं म्हणत त्यांनी भाषण सुरूच ठेवलं. बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. व्यासपीठावरील माइक मिनिटभरासाठी बंद होता. गांधींनी खडे बोल सुनावल्यानंतर बेरड व्यासपीठावरून बाजूला गेले. त्यानंतर गांधी यांनी भाषण केलं. त्यात त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. दरम्यान, भरसभेत मतदारांसमोर हा प्रकार घडल्यानं जिह्यातील पक्षांतर्गत मतभेद समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

Related posts: