|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रम

भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रम 

 पुणे / प्रतिनिधी :

जैन सामुदायिक उत्सव समिती च्या वतीने बुधवार दि. 17 एप्रिल रोजी 2618 वी भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी 8 वा. गोडीजी पार्श्वनाथ मंदिर, गुरूवार पेठ येथून मिरवणूकीला सुरूवात होणार आहे. यामध्ये जैन समाजाचे चारही संप्रदायाचे संघ व पुण्यातील विविध ट्रस्ट, संस्था, मंडळ, महिला मंडळे यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अचल जैन यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सचिव अनिल गेलडा, खजिनदार संपत जैन उपस्थित होते.

यावेळी श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथुन भांडी बाजार, लाल बहादूर शास्त्री चौक, नेहरू चौक, रामेश्वर चौक, टिळक पुतळा, बाबूगेनू चौक, सिटी पोस्ट, आदी मार्गावरून मिरवणूक काढण्यात येऊन ओसवाल बंधू समाज कार्यालय (शंकरशेठ रोड ) येथे मिरवणूकीची सांगण्याता होणार आहे. या मिरवणूकीत विविध देखावे, दृश्ये, संदेश देखिल देण्यात येणार असुन त्यामधील उत्कृष्ट देखाव्यांना आकर्षक रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

पहिल्यांदाच पुणे शहरातील सर्वत्र निघणाऱया मिरवणूका ओसवाल बंधू समाज कार्यालय येथे एकत्रित येतील व त्याचे सभेत रूपांतर होणार आहे. तसेच बुधवार दि. 19 रोजी सकाळी दादावाडी जैन मंदिर येथे श्री जिन कुशल सेवा मंडळातर्फे सामुहिक आराधना, सायंकाळी तुळशीबाग मंडळ परिसरात 108 दिव्यांची सामुहिक महाआरती होणार आहे. तसेच विविध अनाथ आश्रम, वृध्दाश्रम आदी ठिकाणी अन्नदान व आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार आहेत. पांजरापोळ गोशाळा याठिकाणी चारा वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुष्काळ ग्रस्त, अकाल ग्रस्त या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर वितरण व पाणी वाचवा अभियान आणि पथनाटय़ाद्वारे मतदान जागृती करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

 

 

 

Related posts: