|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आमदार अंजली निंबाळकर कार अपघातात जखमी

आमदार अंजली निंबाळकर कार अपघातात जखमी 

सोलापूर : प्रतिनिधी

खानापूरच्या (जिल्हा बेळगाव) आमदार डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांच्या वाहनताफ्याला शुक्रवारी सोलापूरजवळ अपघात झाला. यात आमदार अंजली निंबाळकर जखमी झाल्या असून त्यांच्यावर येथील गंगामाई इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. या अपघातात चालक आणि अंगरक्षकही जखमी झाले आहेत.

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अंजली निंबाळकर शुक्रवारी महाराष्ट्रातील नांदेड भागात दौऱयावर होत्या. या दौऱयावर जात असताना त्यांच्या इनोव्हा कारला सोलापूर येथील राजसाब फार्म हाऊसजवळ दुर्घटना घडली. समोरून येणाऱया कारने ठोकरल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर इनोव्हा कारच्या दोन्ही ‘एअरबॅग’ उघडल्यामुळे त्या बचावल्याचे समजते. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. निंबाळकर यांच्या वाहनाचा चालक महादेव आणि अंगरक्षक सय्यद हेही जखमी झाले आहेत. महादेव यांच्या छातीला तर सय्यद यांच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या अपघाताची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिराने झाली आहे.