|Thursday, August 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » राजकारणात यायला आवडेल

राजकारणात यायला आवडेल 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई:  ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटांनंतर लोकप्रियतेत वाढ झालेली अभिनेत्री सारा अली खानला आता मला राजकारणात यायला आवडेल, असे सांगितल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सारा अली खानची मुलाखत घेण्यात आली होती. त्या मुलाखतीमध्ये साराने सांगितले की, ‘एक यशस्वी अभिनेत्री झाल्यानंतर मला राजकारणात उतरायला आवडेल. पण अभिनयाला माझे पहिले प्राधान्य असेल’ असे सारा म्हणाली. साराने कोलंबिया विद्यापीठातून इतिहास व राज्यशास्त्र विषयाची पदवी घेतली असल्याने तिला राजकारणात रुची आहे हे देखील साराने सांगितले.