|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजेंना प्रचंड मताधिक्याने विजयी करा

उदयनराजेंना प्रचंड मताधिक्याने विजयी करा 

प्रतिनिधी/ सातारा

गेल्या दहा वर्षाच्या खासदारकीच्या काळात सातारा शहरासह जिल्हय़ाचा विकास खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. विकासाचा हा रथ अखंडपणे सुरु राहण्यासाठी येत्या निवडणुकीत सातारा शहरातून खासदार उदयनराजे भोसले यांना गेल्या वेळेपेक्षा प्रचंड मताधिक्यांसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे आणि सामाजिक कार्यकर्ते राजू गोडसे यांनी केले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ यादोगोपाळ पेठ आणि परिसरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली, त्यावेळी त्यांनी आवाहन केले. यावेळी राजधानी व्यापारी संघ, पंचपाळी हौद, दुर्गामाता ट्रस्टचे पदाधिकारी, सप्ततारा सांस्कृतिक मित्र समूह, सप्ततारा महिला बचतगट, सप्ततारा ज्येष्ठ नागरिक संघ, हात्तीखाना मित्र समूह, राजमुद्रा गणेशोत्सव मंडळ, अंजिक्यतारा गणेशोत्सव मंडळ आदींसह तरुण मित्र, महिला, ज्येष्ठ नागरिक पदयात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना दिपाली गोडसे म्हणाल्या, खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा जिल्हय़ाला एक वेगळी ओळख आहे. राजधानी सातारा म्हणून देशभरात ओळखला जातो. खासदारांनी गेल्या दहा वर्षात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यांनी कास धरणाची उंची, पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटर, शहरासाठी भुयारी गटर योजना, शहरात अनेक ठिकाणी उद्यांनाची निर्मिती, सातारा शहर कचराकुंडी मुक्त, झोपडपट्टी विकास योजना तसेच मोफत घरकुल असे अनेक उपक्रम शहरात राबवलेले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्यामुळे सर्वसामान्य घरातील लोकांना अनेक उच्च पद भूषवण्याचा मान मिळाला असून यावर्षीही ते विक्रमी मतांनी निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहनही दिपाली गोडसे यांनी केले.

यावेळी बापूसाहेब उथळे, गजेंद्र ढोणे, राजू गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले. विशाल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर चैतन्य मोहिते यांनी आभार मानले.

प्रभागात ठिकठिकाणी पदयात्रेचे उत्स्फूर्तपणे नागरिकांनी स्वागत केले. यावेळी भालचंद्र भणगे, किशोर मोरे, आनवर पाशा खान, सुरेश शिंदे, चंद्रकांत रसाळ, आसलम भाई बागवान, प्रकाश मोहिते, गजेंद्र ढोणे, आप्पा पिलावरे, श्रीकांत निकम, गोटया परदेशी, विजय शिंदे, सुरेश बादापुरे, ओंकार केंजळे, गणेश यादव, किर्ती काटेकर, प्रवीण शहा, संगीता मुंद्रावळे, गायत्री जंगम, विजय दाभोळकर आदींसह पेठेतील नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Related posts: