|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » झारखंडमध्ये तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान

झारखंडमध्ये तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान 

 

 ऑनलाईन टीम / झारखंड :  झारखंडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये तीन नक्षलवाद्यांन कंठस्नान घालण्यात यश आले आहे. याबरोबरच मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे. या चकमकीमध्ये एक जवानही शहीद झाला आहे. भेलभा घाट परिसरामध्ये ही चकमक सुरु होती.

सीआरपीएफच्या 7 बटालियनने बेलभा घाट येथील जंगल परिसरात स्पेशल ऑपरेशन सुरु केलं होतं. यावेळी नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. सीआऱपीएफ जवानांनी चोख उत्तर देत तीन नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. त्यांच्या मृतदेहासोबतच एक एके-47 रायफल, 3 मॅगजिन्स आणि चार पाइप बॉम्ब इतका शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. चकमकीत सीआऱपीएफचा एक जवान शहीद झाला आहे.

 

Related posts: