|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये उदयनराजे

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये उदयनराजे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. याच स्टार प्रचारकांच्या यादीत साताऱयाचे खासदार उदयनराजे यांना स्थान देण्यात आले आहे. उदनयराजे यांनी सातारा सोडून इतर मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारांकडून करण्यात येत आहे. उदयनराजे यांनी नुकतीच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदार संघात सभा घेतली. या सभेत उदनयराजे यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मतदारांना आवाहन केले. त्याचबरोबर त्यांची सभेतील चौफेर फटकेबाजी जोरदार होती.