|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » सूर्यदत्ता इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईनतर्फे तीन दिवसांचे ‘डिझिना-2019’ प्रदर्शन सुरू

सूर्यदत्ता इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईनतर्फे तीन दिवसांचे ‘डिझिना-2019’ प्रदर्शन सुरू 

पुणे / प्रतिनिधी :

 वृत्तपत्रांपासून साकारलेला सोफासेट व फर्निचर, टाकाऊ कागदापासून उभारलेला सेल्फी पॉईंट, अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाची प्रतिकृती, पेपरच्या साहित्यातून तयार केलेल्या भिंती, विविध पॉट्स, घराच्या आतील सजावटी अशा असंख्य नाविन्यपूर्ण आणि कलात्मक डिझाईन्सचे सादरीकरण पुणेकरांना पाहण्यासाठी खुले झाले आहे. हे प्रदर्शन सोमवार (दि. 15) व मंगळवार (दि. 16) या दोन दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांना विनामूल्य पाहता येत आहे.

 सुर्यदत्ता इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पॅरामेट्रिक संकल्पनेवर इंटीरियर डिझाईन्सच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात रविवारी झाले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील सहायक अधिकारी संतोष वामन, आर्किटेक्ट प्रिया गोखले, महेश बांगड, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्राचार्य अजित शिंदे, विभागप्रमुख मंदार दिवाने, गीता दीक्षित, प्रा. अपूर्वा ठोसर, भूपेश गर्ग, दिशा कुचेकर, विद्यार्थी प्रतिनिधी संकल्प सोनी आदी उपस्थित होते.

 या प्रदर्शनात पेपर, फोमबोर्ड, मॅट्रिक्स, फॅब्रिक, जिओमॅट्रिक्स, टाकाऊ वस्तू यासह विविध नैसर्गिक वस्तूया वापरातून डिझाईन्स साकारले आहेत. एकूण 35 इंटिरियर डिझाइन्सचे मॉडेल्स, 16 पॅनल मॉडेल्स, 982 डिझाईन शीट्स, थ्रीडी मॉडेल्स, छंद म्हणून मुलांनी काढलेली असंख्य पेंटिंग्स मांडण्यात आले आहेत. इंटिरिअर डिझाईन्सच्या एकूण 220 विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन भरवले आहे.

 

 

 

 

Related posts: