|Thursday, November 21, 2019
You are here: Home » उद्योग » बँकांसाठी ‘पीओएस’ अद्ययावत करण्याच्या सुचना

बँकांसाठी ‘पीओएस’ अद्ययावत करण्याच्या सुचना 

टेलिकॉम विभागाचा आदेश : सद्य तंत्रज्ञान कालबाहय़ झाल्याचा दावा

वृत्तसंस्था/ हैदराबाद

टू-जी तंत्रज्ञानावर चालणारे ‘पॉईंट ऑफ सेल’ मशिन हे कालबाहय़ झाले आहे. त्यामुळे बँकांनी आता हे मशिन अद्ययावत करून घ्यावीत, अशी सुचना टेलिकॉम विभागाने केली आहे.

सध्या बँकांकडे टू-जी तंत्रज्ञानावर चालण्याऱया मशिन उपलब्ध आहेत. येणाऱया काळात हे तंत्रज्ञान देशातून नामशेष होईल. त्यानंतर फक्त थ्री-जी, फोर-जी आणि त्यापुढील तंत्रज्ञानच चालणार आहे. त्यामुळे बँकांनी या मशिन अद्ययावत करून घ्याव्यात. अन्यथा, बँकांसमोर तांत्रिक अडचणी निर्माण होतील, असे दूरसंचार मंत्रालयाचे सहसचिव अमित यादव यांनी सांगितले.

इन्स्टिटय़ूट फॉर डेव्हलपमेंट अँड रीसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी या संस्थेत उभारण्यात आलेल्या फाइव्ह-जी यूज केसेस लॅबचे अनावरण यादव यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. दूरसंचार मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय एकत्रितपणे देशात फाइव्ह-जी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या तयारीत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Related posts: