|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्टेशनरी साहित्य प्रदर्शनाची सांगता

स्टेशनरी साहित्य प्रदर्शनाची सांगता 

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर  मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉलमध्ये सुरू असलेल्या, दोन दिवशीय स्टेशनरी साहित्य प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या दोन दिवसात दोन हजार पेक्षा जास्त स्टेशनरी व्यापाऱयांनी भेट देऊन आपले बुकिंग केले आहे

कॅव्हाक सर्व्हिसेस फेडरेशन ऑफ महाराष्ट्र स्टेशनरी मॅन्युफॅक्चर ट्रेडर्स असोसिएशन व शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेतर्फे, स्टेशनरी साहित्याचे दोन दिवस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात स्टेशनरी व्यापाऱयांनी आपले बुकिंग करण्यात आले आहे. जून महिन्यामध्ये शाळा सुरू होतात, या शाळेसाठी लागणाऱया, ई लर्निंग सिरीज लिखाणाचे साहित्य, ऑफिस स्टेशनरी, फाईल बुक, सेलर्स पब्लिशर्स, पेन, सिस पेन्सिल, रबर आधी स्टेशनरी मालाचे 55 स्टॉल्स येथे उभा करण्यात आले होते. या दोन दिवशीय  प्रदर्शनामध्ये लाखोची उलाढाल झाली असल्याचे संयोजकाकडून सांगण्यात आले. स्टेशनरी साहित्य प्रदर्शनाला, पश्चिम महाराष्ट्रातील स्टेशनरी व्यापाऱयांनी भेट दिली होती, या स्टॉल वर फक्त बुकिंग करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक तासाला स्टॉलधारका साठी लकी ड्रॉ काढण्यात येत होता.

या प्रदर्शनाचे आयोजन सुनील जैन, विनायक मोहिते,उमेश कुरळपकर, सतीश माने, यांच्या  सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी या प्रदर्शनाची सांगता झाली.