|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा उमेदवारी अर्ज दाखल

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

ऑनलाईन टीम / लाखनऊ :

भाजपचे लोकसभा उमेदवार केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनऊमध्ये रोड शो करत मोठे शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजचे कार्यकर्ते मोठय़ाप्रमाणात यात सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने घातलेल्या 72 तासांच्या बंदीमुळे ते या रोड शो मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. यावेळी उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा उपस्थित होते. हा रोड शो पक्ष कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या आधी राजनाथ सिंह यांनी हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी अटल बिहारी वाजपयी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जात आहे. लखनऊमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. हा भाजपचा गड मानला जातो.

Related posts: