|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘फिक्की फ्लो’ पुणेच्या अध्यक्षपदी रितू छाब्रिया यांची निवड

‘फिक्की फ्लो’ पुणेच्या अध्यक्षपदी रितू छाब्रिया यांची निवड 

पुणे / प्रतिनिधी :

 ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी उद्योजिका आणि मुकुल माधव फौंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्लो’च्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा संगीता ललवाणी यांच्याकडून रितू प्रकाश छाब्रिया यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. ही निवड 2019-20 या कालावधीसाठी असणार आहे.

 उद्योग आणि व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन महिलांचे सबलीकरण, आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ‘फ्लो’ या संस्थेची 1983 साली स्थापना करण्यात आली. या संस्थेत सहा हजारांपेक्षा अधिक  महिला उद्योजक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट एक्झक्मियूटिव्हजचा समावेश आहे. पुणे विभागात सध्या 400 पेक्षा अधिक महिला सदस्य आहेत. या संस्थेचे देशभरात एकूण 15 विभाग आहेत. महिलांमध्ये उद्यमशीलता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी ‘फ्लो’तर्फे विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा, व्याख्याने, प्रशिक्षण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.