|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘तेर पॉलीसी सेंटर’ तर्फे वाहणांची मोफत पीयुसी तपासणी

‘तेर पॉलीसी सेंटर’ तर्फे वाहणांची मोफत पीयुसी तपासणी 

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त उपक्रम

पुणे / प्रतिनिधी :

 ज्या पृथ्वीच्या अंगाखांद्यावर जीवसृष्टी वाढते तिच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे. हे सर्वाना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या पृथ्वीला वाचवण्यासाठी म्हणून दरवषी 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘तेर पॉलीसी सेंटर’ या पुणे स्थित राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक काम करणाऱया संस्थेने या वषीचा वसुंधरा दिवस एक वेगळय़ा उपक्रमाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संचालिका डॉ. विनिता आपटे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावषीच्या ‘तेर पॉलीसी सेंटर’, पी. एन. गाडगीळ अँड सन्स व महाराष्ट्र बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील वाहनांचे पीयुसी करून देणार आहेत. याअंतर्गत दि. 19 ते 22 एप्रिल पर्यंत हा उपक्रम मोफत राबविण्यात येणार आहे. यावेळी दि. 19 रोजी-अभिरुची मॉल ,सिंहगड रोड,  दि. 20 रोजी-बँक ऑफ महाराष्ट्र ,पुणे ग्रामीण विभाग, नारायण पेठ, दि. 21 रोजी-नदीपात्राचा रस्ता व दि. 22 रोजी-बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल ,शिवाजीनगर येथे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

Related posts: