|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » तृणमूल काँग्रेसकडून प्रचारासाठी बांग्लादेशी अभिनेता

तृणमूल काँग्रेसकडून प्रचारासाठी बांग्लादेशी अभिनेता 

ऑनलाईन टीम / कोलकाता :

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी बांग्लादेशी अभिनेता फिरदौस अहमद यांना पुढे केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत भाजप नेता जे. पी. मजुमदार यांनी कोलकाता निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे.

जे. पी. मजुमदार म्हणाले, ‘नियमानुसार देशातील निवडणुकीत कोणताही विदेशी नागरिक सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली होत आहे. या प्रकरणावरुन विदेशी अभिनेत्याला अटक करता येऊ शकते.

Related posts: