|Monday, August 19, 2019
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्सची 450 अंकानी उसळी : निफ्टी 11,800 चा उच्चांकावर

सेन्सेक्सची 450 अंकानी उसळी : निफ्टी 11,800 चा उच्चांकावर 

सेन्सेक्स 39,364 च्या घरात : इंडसइंड-ओएनजीसीची कामगिरी समाधानकारक

वृत्तसंस्था/ मुंबई

नवीन सप्तहातील दुसऱया दिवशी मुंबई शेअर बाजार तेजीत राहिला आहे. मंगळवारी विक्रमी टप्पा गाठत सेन्सेक्सने 369.80 अंकानी वाढत जात 39,275.64 वर बंद झाला. तर इंट्रा-डे मध्ये हा आकडा 458.5 अंकानी उसळी घेत 39,364.34 वर पोहोचत नवीन विक्रम नेंदवला आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 96.80 अंकानी तेजी नोंदवत 11,778.15 ची विक्रमी पातळी गाठत बंद झाली. इंट्रा-डे मध्ये हा आकडा 11,810.95 चा उच्चांकावर पोहोचला होता.

अभ्यासकांच्या निरीक्षणातून मजबूत विदेशी संकेत आणि जानेवारी ते मार्च या कालावधीमधील कंपन्यांचे सादर होत असणारे सकारात्मक  तिमाही आकडे आणि मान्सून विषयक आयएमडीने दर्शविलेला सामान्य मान्सूनचा आदेश या सर्व घडामोडीच्या परिणामाचा फायदा मंगळवारी मुंबई शेअर बाजाराला झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिवसभरातील व्यवहारात फायानाशिअल,  ऑटो आणि ऑईल ऍण्ड गॅस, कंझ्युमर डय़ूरेबल्स यांच्या शेअर्स सर्वाधिक मागणी राहिली. तर सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्स फायद्यात राहिले आहेत. यात इंडसइंड बँकेचे शेअर्स 3.96 आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्समध्ये 3.58 टक्क्यांनी तेजीत राहिलेत. ओएनजीसीचे शेअर 2.49 टक्के आणि लार्सन ऍण्ड टुब्रो 1.82 टक्क्यांनी फायद्यात राहिल्याची नोंद करण्यात आली.

निफ्टीच्या मुख्य 50 पैकी 36 शेअर्स फायद्यात राहिलेत यात एनएसईचा टायटनचा शेअर 3.11 , ओएनजीसी 2.18 आणि ग्रासिममध्ये 2.18 टक्क्यांनी वधारत बंद झालेत. वायर आणि केबल मॅन्युफॅक्चरिग कंपनी पॉलीकॅब इंडियाचा शेअर पहिल्या दिवशी बीएसईत 17.65 टक्क्यांनी वाढत जात 633 रुपयावर पोहोचला.